आपल्या हॉट अवतारामुळे सतत चर्चेत राहणारी मॉडेल पूनम पांडे यावेळी मुंबई पोलिसांच्या कारवाईमुळे चर्चेत आहे. लॉकडाऊन काळात कोणत्याही कामाशिवाय बाहेर भटकण्यास बंदी आहे. या बंदीचे उल्लंघन करुन पूनम पांडे बीएमडब्ल्यू कारमधून मरिन ड्राईव्ह परिसरात फेरफटका मारत होती. मरिन ड्राईव्ह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये पूनमची कार दिसताच पोलिसांनी कारवाई केली.
लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लघन केल्याप्रकरणी मॉडेल पूनम पांडेविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला, तसेच तिची कार जप्त केली. पूनमविरोधात आयपीसीच्या कलम २६९, १८८ आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी पूनम आणि तिचा मित्र सॅम अहमद (४६) या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
#LokmatNews #lokmatcnxfilmy #poonampandey
#lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber