बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात अंमली पदार्थ विरोधी विभागाने चौकशीच्या तिसऱ्या दिवशी अटक केली. यावेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी अनोख्या प्रकाराने रिया चक्रवर्तीला पाठिंबा दिला. रिया चक्रवर्ती मंगळवारी (8 सप्टेंबर) काळ्या रंगांचा टी-शर्ट परिधान करुन एनसीबीच्या कार्यालयात पोहोचली होती. त्यावर लिहिलं होतं की, "गुलाब लाल असतात, वॉयलेट्स निळे असतात, चला मी आणि तुम्ही एकत्र मिळून पितृसत्ता उद्ध्वस्त करु." सेलिब्रिटी याच ओळी सोशल मीडियावर शेअर करुन रियाला न्याय मिळावा यासाठी आवाहन करत आहेत. रिया चक्रवर्तीच्या टी-शर्टवरील हा मेसेज वेगाने व्हायरल झाला. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, पण सोबतच सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी आपल्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर हा मेसेज पोस्ट केला. शिवाय #justiceforrhea आणि #SmashPatriarchy हॅशटॅगही वापरले.
#lokmat #Rheachakraborty #sushantsinghRajput #Vidyabalan #Lokmatcnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber