‘आत्महत्या कर, अथवा तुझ्यावर बलात्कार करून तुला ठार मारण्यात येईल’, अशा आशयाची पोस्ट X@mannu_raaut या इन्स्टाग्राम अकाउंटवरून देण्यात आल्याची तक्रारी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे केली आहे. तसेच सुशांतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी करणारे टिष्ट्वट रियाने गृहमंत्री अमित शहा यांना केले आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्याप्रकरणी त्याची प्रेयसी रियाला चाहत्यांनी धारेवर धरून ट्रोल करणे सुरू केले होते. मुंबई पोलिसांनीही तिची नऊ तास चौकशी केली होती. त्यानंतर तिला पुन्हा पुन्हा पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात येत होते. दरम्यान, सुशांतच्या मृत्यूनंतर महिनाभरानंतर रिया चक्रवर्तीने त्याच्यासह स्वत:चा एक फोटो अपलोड करत एक पोस्ट केली होती. त्यानंतर आता mannu_raaut या महिलेचा डिस्प्ले पिक्चर असलेल्या अकाउंटवरुन बुधवारी रात्री उशीला तिला धमकी देण्यात आली आहे. रियाने याची माहिती सायबर पोलिसांना देत पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीला कडक भाषेत समजही दिली.
#lokmat #RiyaChakraborty #sushantsinghrajput #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber