आयुष्यात माणसाचं मन मोठं असलं की सगळ्या गोष्टी जिंकता येतात असं म्हटलं जाते. आपल्याजवळील असलेला छोटासा भाकरीचा तुकडा दुस-याला देण्यासाठी सुद्धा आपलं मन मोठं असलं पाहिजे. दुस-याचं मन जिंकण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असते तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. आपलं मन आपल्याला काय सांगत असते किंवा काय विचार करत असते यावर आपले जीवन अवलंबून असते. मनामध्ये कित्येक वेळा चांगले आणि वाईट विचार येत असतात. त्यांमधून चांगले विचार घेऊन आपण ऊंच भरारी घ्यायची असते. इतर गोष्टींचा मोठेपणा करण्यापेक्षा मनाचा मोठेपणा हा केव्हाही चांगला असतो. एकवेळ मनुष्य पैशाने श्रिमंत नसला तरी चालेल, पण मनाने तो नेहमी श्रिमंत असला पाहिजे. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी मनाचे आपल्या जीवनात महत्व काय आहे ? याचे अचूक मार्गदर्शन या व्हिडीओच्या माध्यमातून केले आहे ते तुम्ही नक्की बघा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा