Navneet Rana : शिवसेनेच्या ‘त्या’ नेत्यांवर कारवाई होणार काय?| Narayan Rane| CM | Sakal Media
अमरावती (Amravati): राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM)यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane)यांच्यावर मंगळवारी अटकेची कारवाई करण्यात आली. केवळ बोलल्यामुळे केंद्रीय मंत्र्यांवर अटकेची कारवाई केली जात असेल तर यापूर्वी शिवसेनेच्या नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष तसेच नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi)यांच्याबद्दल अनेकदा खालच्या स्तरावरून टीका केली. त्या नेत्यांवरही गुन्हे दाखल करून अटक करणार काय? असा सवाल अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा (Navneet Kaur Rana)यांनी उपस्थित केला आहे.
#NavneetRana #Amravati #Shivsena #NarayanRane #BJP #Maharashtra Politics