Inspiration : कथा जिद्दी चहावाल्याची अन एका बापाची... | Amboli | sindhudurg | Handicap | Sakal Media
आंबोली: (ता. सिंधुदुर्ग) येथील चौफुला गावातील बबन उर्फ प्रकाश भिकाजी गावडे जिद्दी माणूस. पाचवीत असताना भर वर्गात त्यांचा अपमान झाला. शाळेला रामराम ठोकून ते थेट कोल्हापूरला आले. जगण्याचा संघर्ष येथे सुरू झाला. चहागाडी व्यवसायातून त्यांनी जगण्याला दिशा दिली. आर्थिक स्थितीतून कुटुंबाला स्थिरस्थावर करताना नियतीने त्यांचा एक पाय हिसकावून घेतला. तरीही हा माणूस थांबला नाही. कुबड्या घेऊन तो आजही चहाचा व्यवसाय करतोय. विशेष म्हणजे एक मुलगी दत्तक घेऊन तिला आधार देतोय.
(व्हिडिओ स्टोरी व एडिटिंग : बी.डी.चेचर)
#sindhudurg #Amboli #kolhapur #Inspiration #BabanGawde #Handicap