मूलांक २ असणाऱ्या लोकांचे दांपत्यजीवन सुखात व्यतीत होईल. तीर्थयात्रा होतील. कुटुंबासाठी वेळ दिलात, तर कौटुंबिक जीवन आनंदात व्यतीत होईल. अंकज्योतिषानुसार २ मूलांक असणाऱ्या लोकांसाठी हे वर्ष चांगले जाणार आहे. या वर्षभरात तुम्हाला कष्टाचे फळ मिळेल. विद्यार्थ्यांसाठी थोडी अधिक मेहनत घ्यावी लागेल. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना यशाचे शिखर खुणावेल. तुमचे प्रयत्न तुमचे इतरांपेक्षा असणारे वेगळेपण सिद्ध करतील. या वर्षात प्रेमवीरांचे प्रेमसंबंध दृढ होतील. लग्नाचा विचार करत असाल, तर त्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. नोकरीत बदली अपेक्षित असल्यास मिळू शकेल. काहीतरी वेगळे करून दाखवण्याच्या प्रयत्नात असाल, तर त्यातही यश मिळू शकेल.
#Lokmatbhakti #Mulank #Family #Numerology #Numerologyyear #Hardwork #Success #Happiness
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा