महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून नावारुपास आलेला अभिनेता म्हणजे अभिनेता गौरव मोरे. सध्या गौरव छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. गौरवचा विनोदाचा टायमिंग आणि त्याचा अभिनय चाहत्यांचा विशेष आवडतो. संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या गौरवचा सध्या सोशल मिडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. गौरवने त्याच्या इंन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये गौरव त्याचे हास्य जत्रेतील सहकलाकार अभिनेता ओंकार भोजणे आणि पृथ्वीक प्रताप यांच्यासोबत डान्स करताना दिसतोय. साऊथ सिनेमातील अत्यंत गाजलेलं गाणं ‘वाथी कमिंग’ या गाण्यावर गौरव, ओंकार आणि पृथ्वीक हे तिघही डान्स करताना दिसतायेत. त्यांचा हा भन्नाट डान्स व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरलाय. खरंतर त्यांचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर जेव्हा ‘वाथी कमिंग’ गाण्याचा ट्रेंड सुरू होता तेव्हाचा आहे. पण आता पुन्हा एकदा गौरवने त्याचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केलाय.
Chitralivo
#GauravMore #OnkarBhojane #MaharashtrachiHasyaJatra #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber