२१ वर्षांपूर्वी संदीप आजच्या दिवशी माजलगावहून मुंबईला आला होता. अभिनयाच्या क्षेत्रात नाव कमवण्यासाठी संदीपने मुंबई गाठली होती. मराठवाड्यातील माजलगावच्या या संदीपने अभिनेता होण्याचे स्वप्न पाहिले होते आणि मेहनतीने ते पूर्णही केले. आज यशस्वी अभिनेता म्हणून नावारुपाला आल्यानंतर संदीपला आजही २१ वर्षांपूर्वीचा तो दिवस आठवतो. या आठवणींना उजाळा देत त्याने ही पोस्ट शेअर केलीये. या फोटोवर त्याने लिहिलेल्या कॅप्शनने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलयं. कॅप्शनमध्ये त्याने लिहिलय की, “१४ ॲागस्ट ह्या दिवशी मला मुंबईत येऊन २१ वर्ष पूर्ण होत आहेत. २१ वर्षापूर्वी ज्या यश्टी (एस.टी.) ने मी माजलगाव हून मुंबईला आलो ती ही यश्टी, जी सुटकेस मी घेऊन आलो ती मी अजून जपून ठेवली आहे. ( Snehal VO )
#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #SandeepPathak #MarathiActor
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber