आपल्या गायिकीने रसिकांच्या मनावर ताबा मिळवणारी गायिका म्हणजेच गायिका प्रियांका बर्वे. प्रियांकाच्या घर तिच्या चिमुरड्या बाळामुळे अगदी आंनदाच वातावरण असल्याचं आपल्याला तिच्या सोशल मिडियावरून पाहायला मिळतं. प्रियांका ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिच्या बाळासोबतचे व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसून येत असते. नुकताच तिच्या लेकाच्या म्हणजेच युवानचा पहिला वाढदिवस झाला. यानिमित्त प्रियांकाने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमध्ये तिने दोन फोटो शेअर केले असून या फोटोंत तिच्यासोबत युवान आणि तिचा पती पाहायला मिळतोय. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शन देत लिहिलयं की, ‘तू माझं संपूर्ण विश्व आहेस. तुला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. May you always shine and rise.’ त्यांचा हा फॅमिली फोटो चाहत्यांना खूप पसंतीस पडला असून अनेकांनी कमेंट करत युवानला पहिल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देखील दिल्यात. याशिवाय तिने युवानचेही काही क्युट फोटोज चाहत्यांसोबत शेअर केलेत.
Snehalvo
#PriyankaBarve #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber