लॉकडाऊनमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी अनेक नवे चित्रपट आणि नव्या वेबसीरीज येतात. काहीतरी भन्नाट कथा, वेगवेगळ्या विषयांवर आधारित अनेक मराठी, हिंदी, इंग्रजी वेबसीरीजने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली आहे. या वेबसीरीजवर हिंदी कलाकारांसोबत अनेक मराठी कलाकार बघायला मिळतात. मराठी कलाकारांनी अनेक हिंदी वेबसीरीजमध्ये आपल्या कामाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या बहुचर्चित ‘कार्टल’ या हिंदी वेबसीरिजला काही मराठी कलाकारांची वर्णी लागली आहे. या वेबसीरीजमध्ये अभिनेता जितेंद्र जोशी, अमेय वाघ आणि अभिनेत्री गिरीजा ओक हे मराठी कलाकार झळकणार आहेत. या तिघांच्याही या वेबसीरीजमध्ये मुख्य भूमिका आहेत. नुकताच या वेबीसीरीजचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
#Cartel #WebSeries #Lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber