कोरोना महामारी मुळे यावर्षी नेहमी सारख्या भव्यदिव्य दिंड्या निघणार नसल्या तरी प्रत्येक वारकऱ्यांचं मन हे पंढरपूरच्या वाटेनं निघालं ही असेल हो ना. आज हजारो लाखो वारकऱ्यांना या महामारी मुळे कदाचित पंढरपुरात जाता येणार नाही पण बंधन शरीराला असतात मनाला नाही मानसिक रूपाने आपण दिंडी करू शकतो. चला बरं आपण ज्ञानोबारायांच दर्शन घेऊन आळंदी वरून निघूया.आळंदी म्हणजे आत्मानंद. पालखीचा प्रारंभ आत्मानंदातून होतो. करण आळंदीतून वारकरी निघाल्यानंतर त्याचं हृदय पंढरीच्या भेटीसाठी तळमळत असतं आणि इतरही तो आत्मनंदा मध्ये तल्लीन असतो.
#LokmatBhakti #SantDnyaneshwar #आषाढीएकादशी #AashadhiEkadashiWari2021 #PandharpurVari #LordVitthal #RamKrushnaHari #AashadhiVari2021 #आषाढीवारी२०२१ #VitthalMandir #PandharpurVitthalMandir #DigitalDindi #डिजिटलदिंडी