सरकारच्या मनाईनंतरही ठाण्यात मनसेकडून दहीहंडी साजरी करण्यात आली... मध्यरात्री कृष्णजन्मानंतर नौपाडा येथील मनसेच्या मध्यवर्ती कार्यलयाबाहेर, महिला पदाधिकाऱ्यांनी ही हंडी फोडली... या वेळी हंडी फोडल्यानंतर मनसैनिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीसुद्धा झाली... दरम्यान पोलिसांनी या मनसैनिकांवर कारवाईचा बडगा उगारत, त्यांना ताब्यात घेतलं... यावेळी मनसेचे नेते अभिजीत पानसे आणि अविनाश जाधवही उपस्थित होते... सरकारने परवानगी दिली तर आजही उत्सव साजरा करणार असल्याचं ते म्हणाले... कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता विचारात घेऊन राज्य सरकारने दहीहंडी उत्सवाच्या आयोजनास परवानगी नाकारलीय...
#dahihandi #mns #dahihandicelebration #lockdown #thane #mumbai #maharashtra