Kolhapur : बाप्पाच्या मूर्तीत डोळ्यातून जिवंतपणा आणणारे 'लिखाई' कारागीर
Kolhapur : सर्वांना बाप्पाच्या आगमनाची चाहुल लागलीये. बाजारात गणरायाच्या मूर्त्यांवर शेवटचा हात मारायची गडबड सुरुये. कुशल कामगार या साऱ्या धावपळीत दिसताहेत. आवडत्या मूर्तीला पाहण्यासाठी कुंभार गल्लीत लोकांची गर्दीही वाढत वाढतीये. अनेक नवीन कोरिव कामाच्या, कौशल्याने तयार केलेल्या मूर्ती घेण्याला आपण पसंती देतो. मात्र या सगळ्यात एखादी मूर्ती तेव्हाच उठावदार दिसते, जेव्हा त्या मूर्तीच्या डोळ्यात जिवंतपणा दिसतो. हाच जिवंतपणा आणण्याचे काम करतात ते लिखाई कारागीर.. बाप्पांच्या अशाच अनेक मूर्त्यांमध्ये डोळ्यातून जिवंतपणा आणणाऱ्या लिखाई कारागीरांसोबत साधलेला संवाद...
व्हिडीओ - स्नेहल कदम
#kolhapur