Ganeshotsav 2021: मुंबईचा राजा गणेशगल्लीचा अभिनव उपक्रम | Sakal Media |
आतापर्यंत आपण रक्तदान शिबीर (Blood donation), नेत्र तपासणी शिबीराबद्दल (eye check up camp)ऐकलं आहे. यंदा मुंबईतलं लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली प्रथमच स्टेम स्टेल डोनेशनचं शिबीर आयोजित करणार आहे. खरंतर स्टेम स्टेल डोनेशन हा वेगळा विषय आहे. त्याकडे जाण्याआधी या मंडळाबद्दल मी आपल्याला काही गोष्टी सांगणार आहे. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली हे मुंबईतलं एक प्रसिद्ध जुनं गणेशमंडळ आहे. १९२८ साली स्थापन झालेल्या या मंडळाचं यंदाचं ९४ वं वर्ष आहे. मुंबईत सर्वप्रथम १९७७ साली याच मंडळाने सुवर्ण महोत्सवी वर्षात भारतातील पहिली २२ फुटी गणरायाची उंच उत्सव मुर्ती बनवली व लालबाग हे नाव जगविख्यात केलं. इथे विराजमान होणारा बाप्पा मुंबईचा राजा म्हणून ओळखला जातो. अन्य मंडळांप्रमाणे गणेशगल्लीतही यंदा साधेपणाने पण तितक्याचं उत्साहात उत्सव साजरा होईल. यंदाच्या वर्षी कॅन्सरच्या आजाराशी निगडीत असलेला स्टेम सेल्सचा एक वेगळा उपक्रम ते राबवतायत.
#Ganeshotsav2021 #mumbaicharaja #Ganeshgalli #cancer #Blooddonation #eyecheckupcamp #SakalMedia