Marbat Festival | मारबतीने कोरोना नेला की काय? | Nagpur | Coronavirus | Sakal Media
नागपूर : आज तान्ह्या पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी नागपुरात मारबत उत्सव साजरा करण्यात आला. यंदा कोरोनाचं सावट असल्याने मारबत उत्सव कमी लोकांमध्ये साजरा करण्यात येईल असे समितीकडून सांगण्यात आले होते. त्यातच नागपुरात कोरोना रुग्णसंख्या वाढतेय. 'कोरोनाले...घेऊन...जाय...गे...मारबत', असं साकडं नागपूरकरांनी मारबतीला घातलं होतं. मात्र, उत्सवातील तुफान गर्दी पाहून खरंच मारबतीनं कोरोना नेला की काय? असाच प्रश्न पडतोय.
#Marbat #MarbatFestival #Nagpur #NagpurMarbat #SakalMedia #MarbatCelebration