Rain Updates Jalna (Bhokardan) : भोकरदन शहरासह 15 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला
Bhokardan (Jalna) : तालुक्यातील दानापूर येथील जुई धरण सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे पूर्णपणे भरले असून धरण आज सकाळी ओव्हरफ्लो झाले असून यामुळे भोकरदन शहरासह 15 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
गेल्या काही दिवसांपासून भोकरदन तालुक्यात संततधार सुरू तालुक्यातील धामणा प्रकल्प आधीच ओवरफ्लो झाला असून तालुक्यातील गिरजा ,पूर्णा, केळणा आदी नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
Video : Tushar Patil
#bhokardan #jalna