भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला महाराष्टासहित देशविदेशात श्रीगणरायाचे आगमन होणार आहे. हिंंदु धर्माचा हा सर्वात मोठा सण मानला जातो, बुद्धीची देवता, 64 कलांंचा अधिपती गणांंचा ईश गणपती या दिवशी आपल्या भक्तांंच्या भेटीसाठी येतो आणि मग पुढे 1, दीड, तीन, पाच, सात, दहा, अकरा, एकवीस अशा ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे वास्तव्य करुन मग रजा घेतो, अशा साध्या आणि सुंदर स्वरुपाचा हा सण आहे.