अकोला : पर्यावरण संवर्धनाचे कार्य करणारी डॉ. राजेंद्र सोनोने यांची ‘सायक्लोन’ संस्था, भारतीय बधिरीकरण शास्त्र व तज्ज्ञ परिषद, अकोला व इंडियन मेडिकल असोसिएशन आणि मीडिया पार्टनर ‘लोकमत’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायक्लोन-डे’निमित्त रविवारी शहरात भव्य सायकल रॅली काढण्यात आली. आयएमए सभागृहासमोरून प्रारंभ झालेल्या या रॅलीमध्ये स्वत: जिल्हाधिकारी जी. श्रीकांत हे सहभागी झाले होते.