आंबोलीतील कावळेसाद पॉर्इंट येथील खोल दरीत पडलेल्या दोघा युवकांपैकी एका युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात सांगेली व आंबोली येथील शोध पथकाला तब्बल पाचव्या दिवशी यश आले आहे. बाहेर काढण्यात आलेला मृतदेह प्रताप अण्णासाहेब उजगरे (२४ रा.हुनगीखुर्द जि.बीड)यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर शनिवारी सहाव्या दिवशी एनडीआरएफचे पथक आंबोली येथे येणार असून, ते इम्रान गारदी याचा शोध घेणार आहेत. (व्हीडिओ - अनंत जाधव )