सिंधुदुर्गात पावसानं कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव-आंबेरी पुलावर मंगळावारी सकाळपासून पावसाचे पाणी आल्यानं माणगाव खोर्यातील 27 गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, येत्या २४ तासात कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होईल , असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.