मराठा आरक्षण, पेट्रोल-डिझेलच्या वाढले दर कमी व्हावे, शेतक-यांची कर्जमाफी अन्य मागण्यांसाठी औरंगाबादमध्ये छावा मराठा युवा संघटनेनं भाजपा सरकारविरोधात आंदोलन केलं. यावेळी त्यांनी मुंडण आंदोलन करुन आपला निषेध व्यक्त केला. शिवाय मागण्या मान्य झाल्या नाहीतर महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशाराही दिला.