पिकांवर किटकनाशक फवारताना विषबाधा होऊन मृत्युमुखी पडलेल्या 19 शेतक-यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर शुक्रवारी यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाले होते. यावेळी मानोली गावात शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी फुंडकर यांच्या ताफ्यातील वाहनांवर कापसाची झाडे फेकून आपला रोष व्यक्त केला.