करिनासोबत KRK चं प्रेमसंबंध, KRK चं पुन्हा एकदा वादग्रस्त ट्विट केले
वादग्रस्त ट्विट करून सतत चर्चेत राहणाऱ्या कमाल आर खान उर्फ केआरकेने पुन्हा एकदा वादग्रस्त ट्विट केले आहे. करिना कपूरसोबत चार वर्ष रिलेशनशीपमध्ये होतो, असा दावा त्यानं केला आहे. आपल्या म्हणण्याचा पुरावा म्हणून त्यानं करिनासोबतचा एक फोटोच ट्विटरवर शेअर केला आहे. त्यामुळं उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे.
अभिनेता हृतिक आणि कंगना यांच्यातील अफेअरचा वाद सध्या विकोपाला गेला आहे. या वादात हृतिकला बॉलिवूडमधील कलाकारांकडून वाढत पाठिंबा मिळत आहे. केआरकेनंही आज या वादात उडी घेताना हृतिकला पाठिंबा दर्शवला. मात्र, ते करताना त्यानं नवा वाद निर्माण केला. करिना कपूरसोबतचा एक फोटो त्यानं पोस्ट केला. 'करिना कपूरसोबत ४ वर्षे रिलेशनशीपमध्ये होतो आणि हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडं केवळ हा एकच फोटो आहे. #KanganaRanaut #RangoliChudail' असं ट्विट त्यानं केलं. केआरकेनं हा फोटो खट्याळपणे टाकला असल्याचं बोललं जात असलं तरी त्यामुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.