प्लॅन मध्ये कर्मचारी चोरी करताना केमेऱ्यात झाला कैद | Thief in flight

Lokmat 2021-09-13

Views 5

प्लॅन मध्ये कर्मचारी चोरी करताना केमेऱ्यात झाला कैद

काहीवेळा हरवलेलं सामान परत मिळवण्यासाठी प्रवाशांना खूप मानसिक त्रासही सहन करावा लागतो. अशातच मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी विमानतळावरचा एक धक्कादायक व्हिडिओ ट्विटवर शेअर केला आहे ज्यात काही कर्मचारी प्रवाशांच्या सामानासोबत छेडछाड करताना दिसत आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री नोंगथोमबाम बीरेन सिंह यांनी आपल्या ट्विटवर व्हिडिओ शेअर केलाय. ‘विमानात आपलं सामान खरंच सुरक्षित आहे की नाही हे तुम्हीच पाहा’ असं सांगत हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात काही कर्मचारी प्रवाशांचे सामना उघडून त्यात ढवळाढवळ करताना दिसत आहे. हा व्हिडिओ कोणत्या विमानतळावरचा आहे हे मात्र समजू शकलं नाही. मात्र, प्रवाशांचं सामान खरंच सुरक्षित आहे का यावर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS