6200 फूट उंचीवर असलेले श्रीलंकेची राजधानी कोलोम्बो मधील १७५ किमी अंतरावर नुवारा एलीया मध्ये माता सीतेचं मंदिर आहे. येथील भक्त भाविक येथील स्थानिक भाषेत याला सीता अम्मा असा उदगार काढतात. दिवाळीच्या दिवसात या ठिकाणी विशेष पूजेची आरास असते. येतील ग्रामिक तामिळ भाषा बोलतात त्यामुळे इकडे हिंदी नाहीच्या बरोबरीने बोलली जात असली तरी पाहटेला काकडा आरती आणि हनुमान चालिसाचे उच्चरण होते. श्रीलंकेत आता या दिवसात पाऊस असल्यामुळे थंडीचा कडाका ही अधिक असतो.
याच उंच उंच पर्वत रांगांमध्ये कुठेतरी अशोक वाटिका होती जिथे सीतेचे अपहरण करून ठेवण्यात आले होते. येथील पुरोहित सांगतात कि राम, लक्ष्मण, सीता यांच्या मुर्त्या ५ हजार वर्षापासून आहेत. श्रीलंका पर्यटन विभागाने या ठिकाणची चांगली सोय केले.कारण प्रतिदिन अनेक भारतीय भाविक या ठिकाणाला भेट देतात. भारताप्रमाणे अनेक देशांमध्ये दिवाळी साजरी होते. श्रीलंकेत रामाप्रमाणेच रावणाची ही पूजा होते. पण दिवाळीच्या दिवसात अनेक भारतीय श्रद्धाळू श्रीलंकेत या ठिकाणी येतात आणि येथील या अयोध्या सामान तीर्थक्षेत्राचं दर्शन घेतात
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews