वाघाच्या संरक्षण करता सरकारने अनेक पाऊल उचलली आहे ..जेव्हा अगदी कमी संख्या राहिली तेव्हा अनेक आंदोलनाने झाली आणि थोड्या दिवस त्या करता सगळेच काम करताना दिसले..पण आता त्या गोष्टींना काही वर्ष झाली आणि पुन्हा वाघाच्या संख्ये मध्ये कमी झालेली दिसून येते..राष्ट्रीय बाघ संरक्षण प्राधिकरण च्या अनुसार ऑक्टोबर २०१७ पर्यंत ७३ वाघांचा मृत्यू झाला आहे ह्यात सर्वात अधिक १८ मृत्यू मध्यप्रदेश च्या जंगलात झाला आणि त्यांनतर कर्नाटक मध्ये हि अनेक वाघांची मृत्यू झाली आहे..वाघांच्या ह्या मृत्यू करता अनेक कारण समोर येत आहे त्यात वृद्धावस्था,विजे चे करंट,ऍक्सीडेन्ट आणि विष बाधा अशे अनेक कारण आहे ..कारण काही हि असली तरी एका वर्षात ७३ वाघांचा मृत्यू हि अतिशय चिंते ची बाब आहे..वन्य संरक्षण हे आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे फक्त ते जाणून त्या प्रमाणे वागायला हवे