आता व्हॉट्सअप मराठी मध्ये जाणून घ्या मराठी मनोरंजनाच्या दुनियेतील ताजे अपडेट.

Lokmat 2021-09-13

Views 13

व्हॉट्सअप लग्न’ या आगामी चित्रपटात प्रेक्षकांना पुन्हा एकदा वैभव-प्रार्थनाची केमिस्ट्री अनुभवता येईल. नटसम्राटचे निर्माते विश्वास जोशी आणि ‘दुनियादारी’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते नानू जयसिंघानी यांनी प्रथमच एकत्र येत व्हॉट्सअप लग्न या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

हा चित्रपट ९ फेब्रुवारी २०१८ रोजी व्हॅलेंटाईन डेच्या आठवडय़ात प्रदर्शित होणार आहे. म्युझिकल रोमँटिक लव्हस्टोरी असलेल्या या चित्रपटाचं कर्णमधूर संगीत संगीतप्रेमींपर्यंत योग्य प्रकारे पोहोचावं हा देखील यामागचा हेतू आहे.

प्रदर्शनाची तारीख अगोदर घोषित केल्याने ऐनवेळी होणारा तारखांचा घोळ टाळता येईलच. पण त्यासोबतच चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही मुबलक वेळ मिळेल हा एक महत्त्वपूर्ण विचारही व्हॉट्सअप लग्नच्या निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

या चित्रपटाची आणखी एक खासियत म्हणजे नटसम्राट या चित्रपटाचे निर्माते विश्वास जोशी यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. फिनक्राफ्ट मीडिया आणि व्हिडीओ पॅलेसची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS