BCCI च्या चुकीची किंमत मोजावी लागणार किंमत जाणून घ्या किती कोटींचा आहे दंड | Latest Marathi News.

Lokmat 2021-09-13

Views 0

BCCI च्या चुकीची किंमत मोजावी लागणार किंमत जाणून घ्या किती कोटींचा आहे दंड | Latest Marathi News.

IPL म्हटलं कि अनेक अनेक क्रिकेट प्रेमी खुश होतात. IPL चा खेळ असो किंवा बातमी रोमहर्षक असणार यात शंका नाही आयपीएलमधील एका संघासोबतचा करार अचानक रद्द केल्याने बीसीसीआयला त्या संघाला ८५० कोटींची नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. कोची टस्कर्सने बीसीसीआयविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. २०११ साली आयपीएल-४ च्या मोसमासाठी कोची टस्कर्स हा संघ काही आर्थिक बाबींसाठी आवश्यक असलेली बँक गॅरेंटी सादर करू शकला नव्हता. ज्यामुळे त्यांच्याशी करण्यात आलेला करार रद्द करण्यात आला होता. या संघाला आयपीएलमधून निलंबित करण्यात आलेलं आहे. आयपीएलमध्ये स्थान मिळावं यासाठी या संघाचे मालक असलेल्या १५५० कोटी रुपये मोजले आहेत. आयपीएलच्या चौथ्या मोसमात सामील होणारा हा दहावा संघ होता. या संघाने केलेल्या नुकसानभरपाईच्या मागणीवर लवादासमोर सुनावणी झाली होती. या लवादाने बीसीसीआयला ५५० कोटींची नुकसान भरपाई आणि दिरंगाई झाल्यास वर्षाला १८ टक्के व्याज या दराने पैसे देण्यास सांगितलं होतं. बीसीसीआयने २ वर्ष याबाबत टंगळमंगळ केली. लवादाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात दाद दिली असल्यास तिथेही पराभव झाला असता असं आयपीएलच्या एका पदाधिकाऱ्याने खाजगीमध्ये सांगितलं आहे. सर्व पर्याय संपल्याने आता बीसीसीआयला कोची टस्करला नुकसानभरपाई द्यावीच लागेल. करार रद्द करण्याचा निर्णय हा बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष शशांक मनोहर यांनी घेतला होता. बीसीसीआयचे बहुतांश पदाधिकारी हे या निर्णयाच्या विरोधात होते मात्र तरीही मनोहर यांनी हा निर्णय घेतला. हा निर्णय आता बीसीसीआयला महागात पडतोय अशी संतप्त प्रतिक्रिया आयपीएलच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर दिली आहे. लवादासमोर जाण्यापूर्वी या संघाने ३०० कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी केली होती, मात्र आमच्या पदाधिकाऱ्यांनी तेव्हा त्यांना माज दाखवल्याने ते लवादासमोर गेले आणि आता आम्हाला दुप्पटीपेक्षआ जास्त पैसा द्यावा लागतोय असं या पदाधिकाऱ्याने म्हटलं आहे.

BCCI Cricket

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS