बिग बॉसचा तंटा सध्या सगळ्याच्यांच बोलण्याचा विषय बनला आहे. रोजच्या नव्या वादांमुळे प्रत्येक घटकेला बहर चढत आहे हे मात्र खरं. बिग बॉस मध्ये अभिनेता सलमान खान आणि झुबेर खान यांच्यात झालेल्या भांडणात बरेच कलाकार बोलते होत आहेत. त्यात अग्रणी नाव म्हणजे एजाज खान.
एजाज खान मोठ्या मिश्खीलपणे झुबेर खानला म्हणाले की झोपडपट्टीतून आलेल्यांना शिस्त नाही. त्याच्या राहणीमान व शैक्षणिक दर्जांवर बोट उचलले आहे. एजाज खान म्हणाला बिग बॉसच्या घरात अनेक असे लोक आहेत जे आय फोन लोभापोटी तर काहीजण अगदी फुकट ही बिगबॉस घराची शान वाढवतं आहेत. एजाज खान हा बॉबी खान आहे या झुबेर खानच्या आरोपचं खंडन करताना एजाज म्हणाल 'माझं नाव घेऊन मोदी ही पंतप्रधान झाले आहेत तर याचं ही भलचं होईल'. बिग बॉस हा रियॅलिटी शो आहे त्यात कोणत्याही प्रकारची छापीलता नाही असे तो म्हणाला