बाईक म्हंटल्या बरोबर आवेग आणि त्याच बरोबर त्याला चालवणारे स्ट्रॉंग दिसणारे मुलं हेच चित्र डोळ्या पुढे येतं..पण आता काळाबरोबार चित्र पालटत चालले आहे कधी पुरुषांची पसंत राहिलेली ही हेवी बाईक आता महिलाही खरेदी करत आहेत. अशीच एक पुणे बेस्ड इराणी लेडी बाईकर सध्या चर्चेत आहे. 370 किलोची 800 सीसी BMW GS चालविणारी ही लेडी सध्या 7 खंडाच्या मिशनवर निघालेली आहे.डॉक्टर मारल याजरलूचा जन्म इराणमध्ये झाला. सुमारे 15 वर्षापूर्वी ती पुण्यात आली आणि 6 वर्षापासून बाईकिंग करत आहे. तिने भारतात आल्यानंतर बाईंकिंग सुरु केले. कारण, इराणमध्ये महिलांना गाड्या चालविण्याची परवानगी मिळत नाही.मार्केटिंगमध्ये एमबीए असलेली 35 वर्षाची याजरलूजवळ पीएचडीची सुद्धा डिग्री आहे या इराणी लेडीला एक लाख किमीचा प्रवास करून विक्रम बनवायचा आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews