शिवसेनेच्या कार्यकर्त्याने मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन, मोर्चे काढून सरकारच्या विरोधात घोषणा देतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ‘इतकी गर्दी कशाला... नरेंद्र मोदींच्या मयताला’ अशा घोषणाही दिल्या. ह्या घोषणानं मुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आणि शिवसेना भाजप च्या युती बद्दल चर्चा सुरु झाल्या..पुढे काय होईल ह्याचा कयास सगळे लावण्याचा प्रयत्न करत आहेत..आगामी निवडणुकीत शक्ती वाढवण्यासाठी शिवसेनेने शनिवारी मुंबईत महागाई व पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात आंदोलन केले. मुंबईतील 12 ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले...ह्या आंदोलनत काही शिवसेनेच्या लोकांनी ह्या काही घोषणा केल्या नहीं चाहिये अच्छे दिन; कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन’, ‘नको तो गॅसचा नखरा, बाई आपला चुला बरा’, ‘बहुत हुई पेट्रोल-डिजल के महंगाई की मार, अब उखाड के फेक दो भाजप सरकार’ अशा घोषणा शिवसैनिक देत होते. आझाद मैदानात अनिल देसाई व खा. अरविंद सावंत मोर्चात सहभागी होते.शिवसेना नेते व कार्यकर्त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करून ‘एवढी माणसं कशाला, मोदींच्या मयताला’अशी आक्षेपार्ह घोषणाही दिल्याने वातावरण तापले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews