युनायटेड किंगडम (यु के) मधील मराठी रसिकांसाठी भारतीय आणि खासकरून मराठी मनोरंजन विश्वातील विविध प्रयोग करण्यासाठी ‘बाराखडी एंटरटेनमेंटस्’ ने पुढाकार घेतला असून, रविवार दि. 12 नोव्हेंबर रोजी ’चला हवा येऊ द्या’ टीम लंडनमध्ये खास शो करणार आहे.
लंडनमधील ‘बाराखडी एंटरटेनमेंटस्’चे संचालक अमोघ धामणकर, गंधार बाबरे यांनी ही माहिती दिली.लंडनमध्ये ‘ट्रॉक्सी थिएटर’मध्ये हा खास शो होत असून, ‘झी मराठी’ ची गाजलेली टीम तिथे शो साठी जात आहे.
अमोघ धामणकर आणि गंधार बाबरे या चित्रपटवेड्या दोन अभियंता मराठी तरुणांनी मनोरंजन विश्वातील चांगले प्रयोग, उपक्रम युनायटेड किंगडम वासियांना दाखवायच्या उद्देशाने ‘बाराखडी एंटरटेनमेंटस्’ची स्थापना केली. 2016 मध्ये ‘एक अलबेला’ हा मराठी सिनेमा त्यांनी इंग्लंडमधील 25 ठिकाणी प्रदर्शित केला आाणि त्याचे 75 शो झाले. ‘ब्रिटिश फिल्म सर्टीफिकेशन बोर्ड’कडून प्रमाणित होऊन प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला! अशा तर्हेने ब्रिटिश टेरीटरी मराठी सिनेमाला ‘बाराखडी’च्या माध्यमातून खुली झाली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews