लवकरच देशवासियांना टोल बद्दल आनंदाची बातमी मिळू शकते. ट्रान्सपोर्ट आणि हायवे सेक्रेटरी युद्धवीर सिंग मलिक ह्यांनी माहिती दिली कि नवीन नियमानुसार प्रवास्यांना ‘जेवढे अंतर तेवढाच टोल’ द्यावा लागणार आहे, या आधी टोल वसुली केंद्रांवर ठराविक रक्कम जमा करावी लागत असे, ती आता कमी अंतरासाठी कमी तर जास्त अंतरासाठी जास्त द्यावी लागेल, ज्याने जवळचा प्रवास करणाऱ्यांना ह्याचा फायदा होणार आहे, त्यांनी सांगितले कि पुढच्या एका वर्षात हा नियम लागू केला जाईल. त्यांनी अधिक माहिती दिली कि सुरत ते गुजरातच्या इतर भागांसाठी ‘रोल ऑन रोल ऑफ’ (Ro-Ro) पद्धतीचा विचार केला गेला आहे.
अधिक माहिती नुसार मुंबई ते अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन योजना 2022 पर्यंत पूर्ण करण्यात येईल.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews