लैंगिक शोषणाचा इरफान खान सुद्धा पडला होता बळी जाणून घ्या काय घडला होता प्रकार !
लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवणारा ‘#मीटू’ सध्या खूप चर्चेत आहे. केवळ अभिनेत्रीच नव्हे तर अभिनेत्यांनाही हा धक्कादायक अनुभव आल्याचं काही जण सांगताहेत. कास्टिंग काऊचचा प्रयत्न माझ्याबाबतीतही झाला होता, अशी कबुली अभिनेता इरफान खाननं मटाशी गप्पा मारताना दिली. काय झालं होतं तेव्हा? सिनेइंडस्ट्री असो वा अन्य कुठेही होणारं लैंगिक शोषण हा विषय सध्या जबरदस्त चर्चेत आला आहे. त्यावरुनच ‘#मीटू’ प्रसिद्ध झालाय. केवळ सर्वसामान्यांनाच नव्हे, तर सेलिब्रिटींनाही याचे अनुभव आले आहेत. ‘करीब करीब सिंगल’च्या निमित्तानं मुंटाशी गप्पा मारताना अभिनेता इरफान खाननं त्याला आलेला अनुभव मुंटाला सांगितला. तो म्हणाला, की ‘माझ्यासोबतही बऱ्याच जणांनी कास्टिंग काऊच करण्याचा प्रयत्न केला होता. स्त्रिया तसंच पुरुषांकडूनही मला यासाठी विचारणा झाली होती. त्यामुळे स्त्रिया असं काही करत नाहीत या भ्रमात कुणी राहू नये. अशा लोकांनी मला कास्टिंग काउचच्या ऑफर्स दिल्या ज्यांच्याविषयी मला प्रचंड आदर होता. इंडस्ट्रीत त्यांचा एक आब होता. पण या गोष्टीमुळे माझी त्या लोकांबद्दलची मतं पूर्ण बदलली. तो काळ खूप विचित्र होता. स्ट्रगलर्स यात नेहमी फसतात. मी तेव्हा ‘नाही’ म्हणण्याचं धाडस दाखवलं. शेवटी निवड आपली असते.’
लैंगिक शोषणाचे प्रकार हे घडतच असतात. ज्याच्याकडे सत्ता आहे तो त्याच्यापेक्षा खाली असणाऱ्याचं शोषण करतो. स्त्रियांच्या बाबतीत याचं प्रमाण जास्त आहे. पण अशा लोकांना समोर आणलं पाहिजे, असं तो आग्रहानं सांगतो.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews