कोपर्डे हवेली येथे एक अजब प्रकार निदर्शनास आला.
घरातून पळून जाऊन मुलीने प्रेमविवाह केल्याने समाजात बदनामी होईल, या भीतीने माता-पित्याने रेल्वेखाली उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. ओगलेवाडीतील ही दुर्दैवी घटना घडली आहे.
बबन नारायण पवार (वय 55) आणि सुनंदा पवार (45, दोघेही रा. ओगलेवाडी) असे त्या दाम्पत्याचे नाव आहे. बबन पवार हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा आगारात वाहक म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी घरी आल्यानंतर मुलगी पळून गेल्याचे लक्षात आल्यानंतर पवार दाम्पत्याने आत्महत्या केली. त्यांना दोन मुली आणि मुलगा सुमेश अशी तीन अपत्ये आहेत. पवार कुटुंबीय मूळचे वाघेरी (ता. कराड) येथील आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews