बलात्कार प्रकरणी दोषी ठरलेला बाबा राम रहीम सुनारिया तुरुंगात 20 वर्षाची शिक्षा भोगत असून त्याचे कुटुंबिय 61 दिवसानंतर डेरा परिसरात पुन्हा दाखल झाले. ही मंडळी राजस्थानातील गुरुसर मोडिया येथील डेरामध्ये राहण्यास गेली होती..26 ऑक्टोबर रोजी सर्वजण डेरात परतले आहेत. कुटुंबातील कोणाही सदस्याची माध्यमाशी बोलण्याची इच्छा नाही. डेरामध्ये माध्यम प्रतिनिधींना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. या दरम्यान डेरातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,डेराप्रमुखाचा मुलगा जसमीत इन्सा याने अप्रत्यक्षरित्या डेराची सू़त्रे हाती घेतली आहेत. त्याने डेरामध्ये सत्संग करण्याची योजना आखली होती. पण तसे होऊ शकले नाही. हनीप्रीत व डेरामध्ये झालेल्या बैठकीनंतर पंचकुला येथे हिंसाचार घडवून आणण्याचा कट रचला गेला होता. डेराची चेअरमन विपासना इन्सा पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. विपासनला वारंवार पोलिस ठाण्यात बोलावले जाते. यामुळे ती डेराच्या कामकाजात फार वेळ देऊ शकत नाही..
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews