मंगळवारी घोषित करण्यात आलेल्या ईज ऑफ डुइंग बिजनेस रिपोर्ट 2017 अनुसार भारताने 30 अंकांची गरुडझेप घेवून 100 व्या स्थानी पोहचला आहे. ह्याचा अर्थ असा कि आता भारतात व्यवसाय करणे अधिक सहज होत आहे. कुठल्याही देशाने आतापर्यंत साधलेल्या प्रगतीत हि सगळ्यात मोठी झेप आहे. मागील दोन वर्षात ह्यात कुठलीही सुधारणा झाली नव्हती. आर्थिक निर्णयांबाबत नेहमीच विरोधी पक्षाच्या निशाण्यावर असलेल्या मोदी सरकार ला ह्या रिपोर्ट मुळे नक्कीच समाधान मिळणार आहे. आता हा मुद्धा हिमाचल प्रदेश आणि गुजरात निवडणुकीत सुद्धा वापरला जाईल. अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले कि ईज ऑफ डुइंग बिजनेस रँकिंग ठरवण्याच्या 10 अटी असतात ज्यातल्या 8 अटींमध्ये भारताने सुधारणा केल्या आहेत. ह्यामुळे अनेक विदेशी कंपन्या भारतात येतील आणि गुंतवणूक वाढेल ज्याने अनेक रोजगार निर्माण होतील.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews