दहशतवाद्यांनी सगळ्या जगा मधे हल्ले करून अनेक निरपराध लोकांचे प्राण घेतले आहे अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क शहरात लोअर मॅनहॅटनमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरजवळ एका भरधाव ट्रकने पादचा-यांना चिरडल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण गंभीर जखमी झाले आहे. न्यूयॉर्कचे महापौर बिल दे ब्लाजियो यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितले आहे.हल्लेखोराने जाणुनबुजुन फुटपाथ आणि सायकल लेनवर भरधाव ट्रक घातली व तेथील सायकलस्वारांना जोरदार धडक दिली लोकांना चिरडल्यानंतर ट्रकमधून उडी मारुन हल्लेखाराने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याच्या पोटात गोळी झाडून त्याला अटक केली. त्यावेळी त्याच्याकडून दोन बनावटी बंदुकाही हस्तगत करण्यात आल्या अमेरिकेत आल्यानंतर फ्लोरिडामधून वाहन चालवण्यासाठी त्याने आवश्यक परवाना मिळवला होता. न्यू जर्सी येथे तो वास्तव्यास होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.फ्रान्स आणि जर्मनीमध्ये दहशतवादी संघटना आयएसआयएसने असाच हल्ला घडवून आणला होता. या हल्यामागे कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ट्वीट केले आहे की, आजारी आणि धोकादायक व्यक्तीने केलेला हा एक भ्याड हल्ला आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews