उत्तर कोरियात अणुचाचणीच्या ठिकणाजवळील एक बोगदा कोसळून झालेल्या भीषण अपघातात 200 लोकांचा मृत्यू झाला आहे. जपानी माध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे. वीस दिवसांपूर्वी ही घटना घडली होती.
जपानी टीव्ही चॅनेल असाहीने दिलेल्या वृत्तानुसार, 10 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती. उत्तर कोरियाच्या ईशान्य भागातील पुनगयी-री येथे या नव्या बोगद्याचे काम सुरू होते. हा बोगदा अणुचाचणी करण्यात येणा-या ठिकाणापासून जवळच होता. वृत्तातील माहितीनुसार, बोगदा कोसळला त्यावेळी त्यात 100 लोक अडकले होते. त्यानंतर बचाव पथकाने अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. त्यानंतर मृतांच्या संख्येत वाढ होऊन सुमारे 200 लोकांचा यात मृत्यू झाल्याची माहिती आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews