पहा Video -काँग्रेस च्या नेत्यांवर मनसे च्या कार्यकर्त्यांनी बटाटे फेकले | MNS Clash With Congress

Lokmat 2021-09-13

Views 0

काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते यांच्यात दादरमध्ये जोरदार हाणामारी झाली. त्यामुळे फेरीवाल्यांच्या सन्मानार्थ काढण्यात येणारा काँग्रेसचा मोर्चा बारगळला. दुसरीकडे स्टेशन परिसरात व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांना हाय कोर्टाने मनाई केल्यामुळे याप्रकरणी मनसेचे बळ वाढले आहे.मागील दोन आठवडे मुंबईत फेरीवाल्यांवरून मनसे अाणि काँग्रेस यांच्यात संघर्ष पेटलेला आहे मुंबई काँग्रेसने फेरीवाल्यांच्या सन्मानार्थ एका मोर्चाचे आयोजन केले होते इतक्यात मनसेचे कार्यकर्ते तेथे आले. त्यांनी काँग्रेसच्या मोर्चावर बटाटे फेकण्यास सुरुवात केली. लागलीच दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते भिडले आणि हाणामारी सुरू झाली. गोंधळाची शक्यता असल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS