या क्षेत्रातील हजारो नोकऱ्या धोक्यात | Insecure Jobs In Indian Telecom Sector | Lokmat Marathi News

Lokmat 2021-09-13

Views 0

टेलिकॉम क्षेत्रावर सध्या नोकरकपातीचे संकट घोंगावत आहे. पुढील वर्षी स्थिती अधिकच गंभीर होणार
असून हजारो कामगारांना नोकरी गमवावी लागू शकते. अशी शक्यता नोकरभरती करणाऱ्या कंपन्यांतील
तज्ञांनी व्यक्ती केली आहे. रिलायंस कम्युनिकेशन्सने (आरकॉम) वायलेस उद्योगातील मोठा विभाग बंद
करण्याची घोषणा केली आहे. टाटा ग्रुपनेही मोबाईल कंपनी भारती एअरटेलला विकण्याचा निर्णय घेतला
आहे. टेलिकॉम क्षेत्रात झपाट्याने होणारे बदल आणि विलीनीकरणाचा घाट आदी बाबींमुळे पुढील वर्षी
जवळपास 30 हजार नोकऱ्या जावू शकतात. असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. इन्फ्रास्ट्रक्चर आणि
नेटवर्क इंजिनिअरींग, विक्री आणि वितरण, दूरसंचार, मनुष्यबळ, कॉल सेंटर आदी क्षेत्रातील उमेदवारांसाठी
हा काळ कठीण असेल. त्यामुळे तंत्रज्ञानाशी संबंधित व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी हि धोक्याची
घंटा आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS