कंगना रनोट आणि ह्रतिक रोशन यांचा वाद जुना आहे. गेले दोन वर्ष हा वाद धुसफुसतोय. आता या वादात इतर कलाकारही आले. ह्रतिकच्या समर्थनार्थ तर फरहान अख्तरपासून फराह खानपर्यंत अनेक मंडळी पुढे आली आहेत. त्यावेळी आनंद एल रायसारखी मंडळी कंगनाच्या स्पिरीटचं कौतुक करतायतं.
सध्या सिनेसृष्टीत असे दोन थेट वाद असले तरी इंडस्ट्रीही या दोन कलाकारांत विभागली गेल्याचं चित्र आहे. कारण सध्या कंगना रनोट या गुणी अभिनेत्रीसह कोणीच आघाडीचा कलाकार काम करायला तयार नसल्याचं चित्र आहे. मणिकर्णिका या चित्रपटाला त्याचा फटका बसला. ह्रतिक आणि कंगना या वादाचाच हा परिणाम असल्याचं बोललं जातं. त्याचवेळी विशाल भारद्वाज यांच्या रंगून चित्रपटावेळी तिंच आणि शाहीद कपूरचं वाजलं होतं. त्या चित्रपटात शाहीदला किस करणं कसं अवघड होतं असं बोलून तिने त्याची नाराजी ओढवून घेतली होती. ह्रतिक आणि शाहीदसोबत झालेल्या वादानंतर कंगनाच्या या बेधडक वृत्तीची सर्वांनीच धास्ती घेतली आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews