मराठी चित्रपटाच्या इतिहासामध्ये हे घडणारं 'तिसऱ्यांदा' | Mumbai Pune Mumbai coming soon | लोकमत

Lokmat 2021-09-13

Views 1

पाच वर्षापूर्वी आलेल्या ‘मुंबई पुणे मुंबई’ने महाराष्ट्रासह इतर राज्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश तर मिळविलेच पण प्रेक्षकांनाही वेड लावले. त्या चित्रपटाचा सिक्वेल मुंबई पुणे मुंबई – २ लग्नाला यायचंच नावाने आला आणि त्याच यशाची पुनरुक्ती झाली. आता या चित्रपटांचे निर्माते संजय छाब्रिया आणि सह-निर्माता अमित भानुशाली आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी चित्रपटाचा तिसरा भागही आणण्याचे जाहीर केले आहे. अभिनेते स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांनी दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्यासोबत ‘मुंबई पुणे मुंबई-३’ चित्रपट २७ एप्रिल २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली आहे. मराठी चित्रपटाच्या इतिहासामध्ये एखाद्या चित्रपटाचे तीन भाग प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सतीश राजवाडे म्हणाले, ‘रसिक प्रेक्षकांना गौतम आणि गौरीच्या जीवनामध्ये आता काय घडते आहे, याची उत्सुकता लागली आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS