बहुचर्चित पद्मावती’ चित्रपटाला होत असलेला विरोध काही शमताना दिसत नाही. कर्णी सेना, राजपूत संघटना यांनी या चित्रपटाला विरोध केल्यानंतर आता भाजपच्या खासदाराने लोकांना हा चित्रपट न पाहण्याचे आवाहन केले आहे. मात्र या चित्रपटावर टीका करताना भाजप खासदार चिंतामणी मालवीय यांनी पातळी सोडली आहे. ‘चित्रपटसृष्टीतील लोक आज एका पत्नीला सोडून उद्या दुसरीकडे जातात. ज्यांच्या पत्नी दररोज शौहर बदलतात, त्यांच्यासाठी जौहरची कल्पना अवघड आहे,’ असे वादग्रस्त विधान मालवीय यांनी केले आहे.मध्य प्रदेशच्या उज्जैनचे खासदार असलेल्या चिंतामणी मालवीय यांनी ‘पद्मावती’ चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. ‘थोड्याफार पैशांसाठी इतिहासाची मोडतोड करुन चित्रपटाची निर्मिती करणे अतिशय लज्जास्पद आहे. ही बाब अतिशय चीड आणणारी आहे असे त्यांनी वक्तव्य केलं.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews