राज ठाकरे आले जमिनीवर | लोकमत न्यूज | Raj Thackeray News

Lokmat 2021-09-13

Views 3

म्हणून राज ठाकरे आले जमिनीवर

एरवी कार्यकर्त्यांशी फारसा संवाद न साधणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नाशिकमध्ये लॉबीत कार्यकर्त्यांसोबत मांडी घालून संवाद साधला. त्या वेळी माध्यमांना संबोधून ते म्हणाले, ""जमिनीवर बसलो म्हणून असं म्हणू नका, की "राज ठाकरे जमिनीवर आले.' मला संवाद साधायचा आहे,'' असे म्हणताच टाळ्या वाजवून कार्यकर्ते त्यांच्यासमवेत जमिनीवर बसले. महापालिका निवडणुकीनंतर तब्बल आठ महिन्यांनंतर पदाधिकारी मेळाव्यानिमित्त राज ठाकरे यांचे आज शासकीय विश्रामगृहावर आगमन झाले. त्या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आपली सत्ता गेली अन्‌ विकासकामांचे वाटोळे झाले. महापालिकेच्या आपल्या काळात आपण केलेली विकासकामे सत्ताधारी भाजपवाल्यांनी स्मार्टसिटीमध्ये घुसवून स्वतःची पाठ थोपटून घेतली. असेही ते म्हणाले

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS