रेस्टॉरंट काढले आहे की विद्यापीठ, कोणी काय खावे हे कोणी का ठरवावे? शाकाहारी आणि सुवर्ण पदक याचा काय संबंध?असे सवाल युवासेनेचे आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून पुणे विद्यापीठाला विचारले आहे.
फक्त शाकाहारी आणि निर्व्यसनी विद्यार्थ्यालाच पुणे विद्यापीठाचे ‘योगमहषी राष्ट्रीय किर्तनकार रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा सुवर्णपदक’ दिले जाणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही अजब अट घालण्यात आली आहे. या अटीवर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी विद्यापीठ प्रशासनाला सवाल केला आहे.आदित्य ठाकरेंनी याबाबत ट्विट करून पुणे विद्यापीठाला धारेवर धरले आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews