जगभरात टॅक्सी सेवा पुरवणार्या उबर कंपनीने आता आकाशातही ही सेवा पुरवण्याची तयारी सुरू केली आहे. या फ्लाईंग टॅक्सी सेवेच्या नियंत्रणासाठीचे सॉप्टवेअर बनविण्यासाठी उबरने नासा या संस्थेशी करार केला आहे. नासाने अंतराळातील वाहतुकीऐवजी आकाशातील कमी उंच अशा वाहतुकीसाठी केलेला हा अशा प्रकारचा पहिलाच करार आहे. आतापर्यंत नासाने अंतराळात रॉकेट नेण्यासाठीचे करार केले होते, अशी माहिती उबरने प्रसिद्धी पत्रकात नमूद केली आहे. चार प्रवासी बसू शकतील असे, ताशी दोनशे मैल वेगाने जाणारे विमान टॅक्सीसेवेसाठी 2020 पासून लॉस एन्जेलिस येथे उडू लागेल. या विमानाची चाचणी डल्लास येथे घेण्यात आली होती, असे उबरचे अधिकारी जेफ होल्डन यांनी सांगितले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews