सुपर डूपर हिट चित्रपट बाहुबली 2- द कन्क्लूजन च्या यशानंतर असा अंदाज बांधला जात होता कि लवकरच प्रभास आणि अनुष्का शेट्टी बॉलीवूड मध्ये प्रवेश करतील. बाहुबली च्या हिंदी भागाचे वितरण करण जोहर ने केले होते. आणि करण जोहर च्या प्रोडक्शनला आता प्रभास आणि अनुष्का शेट्टी ला बॉलीवूड मध्ये इंट्रोड्युस करायचे होते. करण जोहर ने ह्यासाठी प्रभास ची भेट सुद्धा घेतली होती. त्यावेळी प्रभास ने चित्रपटासाठी 20 कोटींची मागणी केली होती. ज्यामुळे करण ने हा विचार मनातून काढून टाकला. आता अजून एक बातमी आली आहे करण जोहर ने अनुष्का शेट्टी ला नवीन चित्रपटासाठी विचारले असता तिने नकार दिला , नकार देण्याचे कारण तिने, डेट्स उपलब्ध नाहीत असे सांगितले आहे. खरे कारण तर आपल्याला माहित नाही परंतु असे म्हटले जात आहे कि प्रभास ला हा चित्रपट मिळाला नसल्यामुळे अनुष्काने नकार दिला आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews