दिग्दर्शक रवी जाधव यांनी ‘न्यूड’ या चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप प्रसिद्ध हिंदी लेखिका मनिषा कुलश्रेष्ठ यांनी केला आहे. 48 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून ‘न्यूड’ वगळण्यात आल्याने चर्चेत आला. हा चित्रपट आपल्या ‘कालिंदी’ या लघुकथेवरून घेतल्याचा दावा मनिषा यांनी केला आहे. त्याचप्रमाणे याविरोधात कायदेशीर कारवाईचाही इशाराही त्यांनी दिला. माझी ‘कालिंदी’ ही लुघकथा अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. यापूर्वीही मी दिग्दर्शक रवी जाधव यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र, त्यावेळी त्यांनी मला नीट उत्तर दिलं नाही. आता चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर, ही माझीच कथा असल्याचं समजलं,’ असं त्या म्हणाल्या. यासंदर्भात पुढे त्या म्हणाल्या की, ‘लेखकांना सौजन्य किंवा पैसे द्यायचे नसतात, म्हणून अशा घटना घडतात. वेळ पडल्यास मी रवी जाधव यांच्याविरोधात मी कायदेशीर कारवाई करेन.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews